आता लॉकडाऊन नको, कडक निर्बंध व उपाययोजना महत्वाच्या.:- डॉ राजन माकणीकर

आता लॉकडाऊन नको, कडक निर्बंध व उपाययोजना महत्वाच्या.:- डॉ राजन माकणीकर

मुंबई (प्रतिनिधी) कोरोना संक्रमण राज्यात फोफावत असून आता लॉकडाऊन कारण्यापेक्षा
कडक निर्बंध व उपाययोजना कराव्यात असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

सप्टेंबर पासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने या महिन्यात पुन्हा डोके वर काढले आहे, फेब्रुवारीपासून दररोज शेकडोने संख्या वाढत आहे, की फार चिंतेची बाब आहे.

पुन्हा जर लॉकडाऊन झाला तर गरिबांचे फार मोठया प्रमाणात भूकबळी होऊन देशात मृत्यूचे तांडव उभारेल,

गोर गरिबांच्या चुली थंडावल्या आहेत, हाताला पूर्वपणे काम नाही, खिसा फाटका झाला आहे, महागाई वाढली असून पोटाची खळगी कशी भरावी याचा प्रश्न आजही सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

कर्जावर घेतलेले दुचाकी चारचाकी वाहनांची हप्ते अजून थकीत आहेत, बँका कडून सक्तीची वसुंली केली जात आहे, प्रसंगी वाहने ओढून घेतली जात आहेत, शेतकरी तर पारचा बुडाला आहे, हातावर पोट असलेल्याचे फार बेहाल झालेले आहेत,

लॉक डाऊन चे आर्थिक व भौतिक परिणाम उद्भवत अनेक सामाजिक परिणाम देखील जाणवत आहेत, मॉर्निंग व एव्हनिंग वॉक, शतपावली अभावी जेष्ठ नागरिक कट्टयाशी तुटलेला संपर्क जेष्ठांना अडचणीचा ठरत आहे, त्यांचा कोंडमारा होत आहे या अन्य भरपूर बाबी आहेत ज्या सर्व नागरिकांवर प्रभावी ठरत आहेत.

सत्ताधाऱ्यांनी लॉकडावून करण्यापेक्षा कोरोना संसर्गापासून बचावात्मक कारवाही करावी. असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

Spread the love

Leave a Reply