आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर विविध विकासकामांचे लोकार्पण दिनांक १३ फेब्रुवारी रोजी

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर विविध विकासकामांचे लोकार्पण दिनांक १३ फेब्रुवारी रोजी

विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर पोंभुर्णा येथील विविध विकासकामांचे लोकार्पण दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्‍न होणार आहे.
 
पोंभुर्णा येथील अत्‍याधुनिक तालुका क्रिडा संकुलाचे लोकार्पण दुपारी 1.00 वा., गाव तलावाच्‍या सौंदर्यीकरणाचा लोकार्पण सोहळा दुपारी 1.30 वा., पोंभुर्णा येथील सर्व सोयींनी परिपूर्ण अशा व्‍यायामशाळेचे लोकार्पण दुपारी 2.00 वा. तर येथील श्री राजराजेश्‍वर मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण व जिर्णोध्‍दाराच्‍या कामाचे लोकार्पण दुपारी 2.30 वा. संपन्‍न होणार आहे.
 
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर सदर विकासकामांचे लोकार्पण त्‍यांच्‍या हस्‍ते होणार असून कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्‍याने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा  जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, नगर पंचायतीचे माजी अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, सौ. श्‍वेता वनकर, माजी उपाध्‍यक्षा सौ. रजिया कुरैशी, अरूण कोतपल्‍लीवार, अजित मंगळगिरीवार, नंदकिशोर तुम्‍मुलवार, ईश्‍वर नैताम, महेश रणदिवे, ऋषी कोटरंगे, वैशाली बोलमवार, विनोद कानमपल्‍लीवार, नरेंद्र बघेल आदींची प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहे. वचनपुर्तीच्‍या या सोहळयाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply