गडचिरोली जिल्हयातील धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करा.भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

गडचिरोली जिल्हयातील धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करा.भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,गडचिरोलीचे आमदार डॉ.देवरावजी होळी,मा.कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी यांच्या नेतृत्वात निवेदन.

दिनांक 28 डिसेंबर 2020
गडचिरोली जिल्हयात यावर्षी काही भागात धानाचे उत्पादन ब-याच प्रमाणात झाले असतांना शासनाच्या वतीने खरेदी करण्यात येत असलेल्या धान खरेदीची मर्यादा कमी करून केवळ एकरी ९ क्विंटल ६० किलो करण्यात आली आहे.
मागील वर्षी खरेदी मर्यादा एकरी १२ क्विंटल असतांना ती वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्याने शेतकरी बांधवामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून.धान खरेदीची मर्यादा वाढवून एकरी २० क्विंटल करण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधकारी गडचिरोली यांना भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,गडचिरोलीचे आमदार डॉ.देवरावजी होळी, आमदार मा.कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, न प वडसाचे उपाध्यक्ष मोतीलाल जी कुकरेजा, तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
निवेदनाच्या माध्यमातून धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करण्यात यावी,अतिक्रमण धारक शेतक-यांना धान खरेदीसह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा ,वनहक्क् धारक शेतक-यांना धान खरेदीसह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा,धान खरेदीच्या प्रक्रियेला गती देवून शेतकऱ्यांना होणारा त्रास दुर करण्यात यावा.अशा प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली मागण्या मंजूर न केल्यास भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून शासनाला देण्यात आला.

Spread the love

Leave a Reply