कोरेली बु. येथे मुक्तीपथ अभियान तर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन.

कोरेली बु. येथे  मुक्तीपथ अभियान तर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन.

ग्रामीण प्रतिनिधी अहेरी/अनिल आलाम

अहेरी तालुक्यातील कोरेली बु. येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातुन एकूण १५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.
दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १६ रुग्णांनी शिबिरात नोंदणी करून १५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. साईनाथ मोहुर्ले यांनी उपचाराला आलेल्या रुग्णाला समुपदेशन केले. संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. दरम्यान मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी शिबिराला भेट देऊन दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदी बाबत रुग्णांना मार्गदर्शन केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. शिबिराचा यशस्वीतेसाठी आनंद दुर्गे, पोलीस पाटील कपील आत्राम, सुनिल दुर्गे, सूरज चांदेकर यांनी सहकार्य केले

Spread the love

Leave a Reply