ना.विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने रुग्णाना फळ वाटप.

ना.विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने रुग्णाना फळ वाटप.

अहेरी:- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री.विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या आज वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी येतील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णाना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या शुभ हस्ते फळ वाटप करण्यात आले.यावेळी महागाँव येतील उपसरपंच श्री.श्रीनिवास आलाम,खाँदला ग्राम पंचायतचे सदस्या सौ.वंदना अलोने,राजाराम ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,सिरोंचा प.स.चे माजी प.स.सदस्य श्री.चँद्रु तोड़ासाम,आदिवासी विध्यार्थी संघाचे अहेरी शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,कवडु नवले,मिलिंद अलोने,गणेश चौधरी सचिन मैदावार,प्रकाश दुर्गे,राकेश सड़मेक,विलास गलबले,आदि उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply