कोरची तालुक्यातील शेतकरी बोनसच्या प्रतिक्षेत

कोरची तालुक्यातील शेतकरी बोनसच्या प्रतिक्षेत

छत्तीसगड सीमेलगत असलेला नक्षलग्रस्त आदिवासी तालुका कोरची. येथील शेतकरी सिंचनाअभावी फक्त खरीप हंगामाचे पीक घेतात आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलाही जोडधंदा नसल्याने फक्त शेतीच्या भरवश्यावर आपली उपजीविका चालवतात व त्याच उत्पन्नावर मुलांचे शिक्षण व वाढत्या महागाई सोबत लढत आहेत. कोरची तालुका लगत असलेल्या छत्तीसगड या राज्यात छत्तीसगड सरकारने लगेच धान्य दराच्या खरेदी सोबत 300 रुपये प्रति क्विंटल असे बोनस देऊ केले आहे, तसेच तिथे बारदान्याचा पुरेपूर साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या मालाची वेळेवर उचलली करण्यात येते. परंतु आपल्या महाराष्ट्रात याचे उलट का?
कोरची तालुक्यात विशेषतः धान्याचे पीक काढले जाते जे दैनंदिन जीवनातील उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. यावर्षी पावसाने वेळीच दडी मारल्यामुळे पाहिजे तितके उत्पन्न काढता आले नाही आणि शासनाने अजूनही मदतीचे हात पुढे केले नाही. तसेच अजूनही शेतकरी बोनसपासून वंचित असून फक्त शासनाकडून केलेल्या घोषणाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रत्येक सेंटरवर बारदाने मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होते, परंतु या वर्षी शासनाने प्रति बारदाने २० रुपये या दराने शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बाजारपेठेत बारदान्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि शेतकरी अव्वाच्या सव्वा भावात भारताने विकत घेत आहेत आजच्या तारखेला बारदान्याची बाजारांमध्ये साधारणत किंमत २५ ते ३० रुपये सुरू आहे आणि ते सुद्धा मिळवणे म्हणजे गरीब शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे आणि २५-३० रुपयात खरेदी करण्यात आलेला बारदाना शासनाला २० रुपयात देणे म्हणजे शेतकऱ्यांची खुलेआम होत असलेली पिळवणूकच आहे.
नुकताच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथील नवनिर्मित मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल २५०० रु. दराने देण्याचे निर्देश जाहीर केले आहे आणि महाराष्ट्र सरकार १७५० ₹ प्रती क्विंटल या दराने धान खरेदी करीत असून महाराष्ट्र शासनाला कधी जाग येईल? या प्रतीक्षेत अजूनही महाराष्ट्राचे शेतकरी आहेत. महाराष्ट्र लगत असलेल्या छत्तीसगड राज्यात धानाला भाव जास्त व महाराष्ट्राला कमी का? असा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात फोफावत आहे

Spread the love

Leave a Reply