ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर

गडचिरोली : माहे एप्रिल, 2020 ते जून, 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या तसेच माहे जुलै, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित अशा एकूण 362 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 25 सप्टेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र विधान सभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. त्याकरीता मतदार यादीचा प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यामध्ये मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनां‍क 25.09.2020 असा आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार दि.
०१/१२/२०२० आहे. हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार दि. ०१/१२/२०२० व सोमवार दि. ०७/१२/२०२० आहे.

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे गुरूवार दि. १०/१२/२०२० असणार आहे. एकुण ग्रामपंचायत संख्या 457 पैकी एकुण निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती 362 आहेत.

Spread the love

Leave a Reply