शाळा बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा.परिषद उच्च.प्राथमिक शाळा छल्लेवाडा येतील रक्षा गुरूनुले आकाशवाणीवर

शाळा बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा.परिषद उच्च.प्राथमिक  शाळा छल्लेवाडा येतील रक्षा गुरूनुले आकाशवाणीवर

ग्रामीण प्रतिनिधी अहेरी /अनिल आलाम

शाळा बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत अहेरी तालुक्यातील राजाराम केंद्रा अंतर्गत येत असलेले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छलेवाडा येतील शाळेची विद्यार्थीनी ही संवेदनशील,अवघड व ग्रामीण भागात शिकणाऱ्या कु.रक्षा वसंत गुरुनुले ही विद्यार्थीनी दिनांक १९ नोव्हेंबर २०२० ला सकाळी १०-३० वाजता नागपूर आकाशवाहिनी केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार आहे. अध्ययन,निष्पती, व गुणवत्ता विकास कार्यक्रम गडचिरोली (नागपूर विभाग) अंतर्गत कोरोना संकटकाळात विद्यार्थीनी शैक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी मुलाखती व्दारे सदर विद्यार्थीनीची स्पर्धात्मक निवड करण्यात आली आहे. या मुलाखतीत संबधित विद्यार्थिनीला विचाऱ्यात आलेले शैक्षणिक प्रश्नाचे उत्तरे मोकळेपणाने दिली आहेत. दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. असून रक्षाने शिक्षणाचे बळावर भावी आयुष्यात खुप काय व्हायचे असल्याने सांगितले. सदर मुलाखतीसाठी अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य प्रथम फाऊंडेनचे मार्गदर्शन श्रीकात पावडे, राजेश गर्गम, केंद्रप्रमुख, सुनिल आईचवार मुख्याध्यापक सामा सिडाम वर्गशिक्षक, समय्या चौधरी, सुरजलाल येलमुले, कल्पना रागीवार, राजेंद्र दहिफळे, मुसली जुमडे, बाबुराव कोडापे , तसेच आई अनिता गुरुनुले वडील वसंत गुरूनुले , आजी आजोबा, काका, आत्या सर्वांनी सहकार्य केले आहे.

Spread the love

Leave a Reply