समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे. सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रतिपादन.

समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे. सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रतिपादन.

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दमारंचा भंगारामपेठा येते आदिवासी गोटुल समिती कडून विजयदशमी निमित्ताने आदिवासीचे आराध्य दैवत लंकापती रावण मंडावी यांची कार्यक्रम साजरी करण्यात आली.सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके,बिरसा मूंडा, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा अर्चाना करण्यात आले.व कार्यक्रम घेण्यात आले.
त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे म्हणाले आज आपण विजयदशमी महाउत्सव व लंकापती रावण मंडावी यांची कार्यक्रम आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजचे उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी श्री.सत्यनारायण कोडापे,श्री.राहुल पोरतेट, यांनी सुध्दा उपस्थितीत आदिवासी बांधवाना सखोल अशी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी प.स.सभापती तथा विद्यमान प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम होत्या तर यावेळी मंचावर अनिल मडावी,सौ.वनोजा कोरेत,प्रमोद कोडापे,नामदेव पेंदाम,रमेश गावडे,लक्ष्मण कोडापे,आदि होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.जिलकरशाही मडावी यांनी केली.तर संचालन श्री.बापू आत्राम यांनी केली.यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply