नवरगावच्या चित्रकार विद्यार्थ्याचे उज्जन मध्ये सुयश

नवरगावच्या चित्रकार विद्यार्थ्याचे उज्जन मध्ये सुयश

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार-
कलावर्त न्यास आयोजित तेविसावा कलावर्त इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल मध्यप्रदेशातील उज्जन इथे नुकताच पार पडला. सदर फेस्टिवल ला भारतातून शेकडो चित्रकारांनी उपस्थिती लावली. तीन दिवसीय ह्या उत्सवात हजारो कलाकृती निर्माण झाल्यात. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी आपली छाप सोडली व बक्षिसे सुद्धा पटकावून आपल्या महाविद्यालयाचे नाव उंच केले. त्यात क्रमशः चेतन वाढई याला प्रथम क्रमांक आणि रोख सहा हजार रुपये रोख आणि अश्विनी गावडे हिला द्वितीय क्रमांक आणि चार हजार रुपये रोख तसेच सुरभी कागदेलवार हिला गोल्ड मेडल रिकीक्षा राजुरकर हिला सुवर्ण पदक , श्वेता गुरु हिला उत्तेजनार्थ 1000 रुपये रोख पुरस्कार प्राप्त झालेत. त्यांच्या या यशाबद्धल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर, प्रा. अतुल कामडी, प्रा. कैलास घुले, प्रा. श्वेता पोइनकर, लक्ष्मीकांत लेंझे यांनी सर्व पुरस्कार विजेत्या विध्यार्थ्याचे कौतूक केले आहे.

Spread the love

Leave a Reply