जिल्हयात आज पुन्हा 119 नवीन कोरोना बाधित आज 51कोरोना मुक्त

गडचिरोली (जिमाका दि.07 ऑक्टो) : गेल्या आठवडयापासून सरासरी शंभरच्या पटीत रूग्णसंख्या वाढत असून आज पुन्हा 119 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकुण सक्रिय बाधितांमधील आज 51 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 954 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 3505 वर पोहचली आहे. तर यापैकी 2530 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार 72.18 टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या जिल्हयात आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 27.22 असून मृत्यूदर 0.60 टक्के आहे.

आज नवीन 119 बाधितांमध्ये गडचिरोली 58, अहेरी 09, चामोर्शी 06, आरमोरी 00, भामरागड 01, धानोरा 10, एटापल्ली 10, कोरची 02, कुरखेडा 06, मुलचेरा 01, सिरोंचा 02 व वडसा येथील 14 जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या 51 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 29, अहेरी 0, आरमोरी 4, भामरागड 2, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 1, मुलचेरा 1, सिरोंचा 2, कोरची 0, कुरखेडा 1 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 58 बाधितांमध्ये आयटीआय चौक 2, गोकुळनगर 4, रामनगर 1, सुयोगनगर 1, कन्नमवार नगर 1, कॅम्प एरिया 1, चामोर्शी रस्ता 1, चंद्रपूर रोड 2, कलेक्टर कॉलनी 2, दुर्गा मंदीर चौक 1, गांधी वार्ड 2, शहर 2, विद्यापीठ कॉम्ले िक्स 1, इतर जिल्हयातील 3, कारगिल चौक 1, खरपुंडी 4, कुंभीटोला रहिवासी 1, कुरूड येथील 1, माडेतुकूम 1, इतर राज्यातील 1, मेडिकल कॉलनी 1, नवेगाव 4, एनटीसी होस्टेंल 1, बोधली पीएचसी 2, पोलीस स्टेशन गड. 1, रामनगर 3, रामपुरी वार्ड 5, रेव्हीन्यू कॉलनी 1, शिवाजी कॉलनी 1, स्नेहानगर 1, शिक्षक कॉलनी आयोध्या नगर 1, त्रिमुर्ती चौक 1, येवली 2 जणांचा समावेश आहे.

अहेरी 9 मध्ये 6 शहरातील आहेत, महागाव, मरपल्ली, प्राणहिता येथील प्रत्येकी एक एक जणाचा समावेश आहे. भामरागड मधील 1 स्थानिक आहे. चामोर्शी मधील 6 मध्ये मु. कान्होली 1, आष्टी 2, घोट 1, सोनापूर 1, शहरातील 1 चा समावेश आहे. धानोरा 10 मध्ये चातगाव शोधग्राम 5 व शहरातील 5 जणांचा समावेश आहे. एटापल्ली 10 मध्ये सीआरपीएफ 4, तहसिल कार्यालय 1, पोलीस 2 व 3 स्थानिक आहेत. कोरची 2 मध्ये बोटेकसा 1 व शहरातील 1 जण आहे. कुरखेडा 6 मध्ये 1 पुराडा तर बाकी शहरातील आहेत. मुलचेरा 1 शहरातीलच आहे. सिरोंचा 2 स्थानिक आहेत. वडसा 14 मध्ये भगतसिंग वार्ड 1, इतर जिल्हा 1, सीआरपीएफ 4, गांधी वार्ड 2, कासारी 1, विसोरा 3 व वडसा मधील 2 जणांचा समावेश आहे.

Spread the love

Leave a Reply