हार्बर लाईन बंद ! ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतूक खोळंबली

हार्बर लाईन बंद ! ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतूक खोळंबली


वाशीकडून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर पनवेल आणि खांन्देश्वर रेल्वे स्थानका दरम्यान तुटली.

 पनवेल रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. सकाळी 6.00 वाजल्यापासून ही वाहतूक सेवा खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तर पनवेलहून ऑफिससाठी सीएसएमटीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.  

वाशीकडून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर पनवेल आणि खान्देश्वर रेल्वे स्थानका दरम्यान तुटली. त्यानंतर, सकाळी 6 वाजल्यापासून हार्बर रेल्वे बंद पडली होती. त्यामुळे मुंबई, सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. ऑफिससाठी वेळेवर न पोहचून शकल्याने आज सुट्टी घ्यावी लागणार किंवा हाफ डे टाकावा लागणार, अशी चर्चा रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये होत होती. 
 
Web Title: Harbor line closed! Overhead wire breaks local traffic in panvel

Spread the love

Leave a Reply